पुणे नगर सह्याद्री : राज्य सरकारने जमिनींच्या नोंदी सरकार दरबारी एकत्रितजमा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. वन, वक्फ, देवस्थान आणि भाडेपट्ट्...
पुणे नगर सह्याद्री :
राज्य सरकारने जमिनींच्या नोंदी सरकार दरबारी एकत्रितजमा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. वन, वक्फ, देवस्थान आणि भाडेपट्ट्याने असणाऱ्या सोळा प्रकारच्या जमिनींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभागाने ‘रेव्हेन्यू रेकॉर्ड रजिस्ट्री फ्रेमवर्क’ हा प्रकल्प हाती घेतला आला आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या जमिनींची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
राज्याभर प्रत्येक तहसीलमध्ये तलाठ्यांच्या मदतीने तसेच त्यांच्या माहितीच्या आधारावर जिल्ह्यांचा अहवाल तयार केला जातो. यातून राज्याचाही अहवाल तयार होतो. ही प्रक्रिया सध्या मानवी पद्धतीने राबवली जाते. या अहवालात अनेक तांत्रिक चुका होण्याची शक्यता असते. अहवाल अचूक आणि एकदाच देता यावा यासाठी ‘रेव्हेन्यू रेकॉर्ड रजिस्ट्री फ्रेमवर्क’ हा नवा प्रकल्प महसूल विभागाने हाती घेतला आहे. त्यातून तलाठी दफ्तराची मंडलाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी; तसेच राज्य पातळ्यांवर माहिती एकत्र करता येणार आहे.
यात ‘जमिनींचे एकूण सोळा प्रकार आहेत. त्यांची माहिती एकत्र करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यास विविध प्रकारच्या जमिनींचे क्षेत्र किती आहे, हे समजल्यास त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. जमिनींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महसूल खात्याची असून, अनेक प्रकारच्या जमिनींचे व्यवस्थापन करणे अवघड आहे. वर्ग दोनमधून एकमध्ये जमिनींच्या प्रकारात बदल होत असतात. त्याची माहिती जमवून ठेवणे उपलब्ध व्हावे, यासाठी ‘रेव्हेन्यू रेकॉर्ड रजिस्ट्री फ्रेमवर्क’ या प्रकल्पांतर्गत सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे. त्यात या माहितीचे संकलन करून ठेवता येणार आहे. तसेच निरीक्षण करणे शक्य होणार असल्याची माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके यांनी दिली.
COMMENTS