दिल्लीतील बड्या हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांची शुटींग करणाऱ्या आणि या जोडप्याांना नंतर ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ...
दिल्लीतील बड्या हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांची शुटींग करणाऱ्या आणि या जोडप्याांना नंतर ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
नवी दिल्लीतील हॉटेलमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील द्वारका येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याला एके दिवशी एक मेसेज आला. हॉटेलमधील प्रणयक्रिडेचा व्हिडीओ यूट्यूबवर टाकण्याची या जोडप्याला धमकी देण्यात आली. त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणीही करण्यात आली.या जोडप्याने संयमाने वागत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली अन् एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श झाला.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, द्वारका येथील एका हॉटेलमध्ये एक जोडपं उतरलं होतं. काही दिवसानंतर त्यांना इन्स्टाग्रामवर धमकावणारा मेसेज आला. तुमचा रोमांसचा व्हिडीओ आमच्याकडे आहे. तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये नाही दिले तर हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल करू. अशी धमकी या जोडप्याला देण्यात आली होती. हा मेसेज वाचल्यानंतर हे जोडपं टेन्शनमध्ये आलं. ब्लॅकमेलर्सला पकडायचं कसं? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी सरळ पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. खंडणी वसूलीची कलमंही लावली. पोलिसांची एक टीम तयार करून तपास चक्र फिरवली. हा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व ब्लॅकमेलिंग रॅकेटचा मास्टरमाइंड हॉटेलचा रिसेप्शनिस्ट असल्याचं आढळून आलं. या रिसेप्शनिस्टने दोन मित्रांना हॉटेलमध्ये नोकरी दिली. त्यानंतर जोडप्यांची ब्लू फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनीही आरोपींना अटक करण्यासाठी सायबर टुल्सचा वापर केला. इन्स्टाग्रामच्या आईडीशी मोबाईल नंबर कनेक्ट होता. उत्तर प्रदेशातील हा नंबर होता. मात्र, पत्ता बनावट होता. उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये पोलिसांनी विजय नावाच्या आरोपीला अटक केली. त्याने आपल्या साथीदारांची नावेही पटापटा सांगितली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता अंकूर आणि दिनेश या दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी या दोघांना हिमी अटक केली.
COMMENTS