छत्रपती संभाजीनगर नगर सह्याद्री : राज्यात फायनास कंपनीकडून कर्ज घेऊन दुचाकी मोठवूया प्रमाणात खरेदी केल्या जातात. त्यात कर्ज घेण्यारयाच एक...
छत्रपती संभाजीनगर नगर सह्याद्री :
राज्यात फायनास कंपनीकडून कर्ज घेऊन दुचाकी मोठवूया प्रमाणात खरेदी केल्या जातात. त्यात कर्ज घेण्यारयाच एकदा हफ्त्या थकला तर दुचाकी ओढून नेली जाते. अशीच घटना संभाजीनगर येथे घडली. दुचाकींचा एका हफ्त्या थकल्याने तक्रारदाराला धमकी देत दुचाकी उचलून नेणे फायनास कंपनीला व्हागलेच भोवले. तक्रादाराने केलेल्या तक्रारीवरून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष स्मिता कुलकर्णी व सदस्य संध्या बारलिंगे यांनी तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये तीन दिवसांच्या आत देण्याचे आदेश संबंधित फायनान्स कंपनीला दिले आहेत.
या घटनेतील तक्रादार बंडू थोरे यांनी ‘मास फायनान्स कंपनी’कडून दुचाकी घेण्यासाठी कर्ज उचलले होते. त्यानी त्या कर्जाचे हफ्ते नियमित भरले होते. त्या प्रकरणांतील तक्रादारचा एकाच हफ्ता थकला असतांना आणि तो हप्तासुद्धा भरण्यास तक्रारदार तयार होता. मात्र बॅँकेचे कार्यालय बंद होते.
त्या संबंधी तक्रारदाराने बँकेच्या दूरध्वनीवर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तो शेवटचा हप्ता थकला. हे लक्षात न घेता २० डिसेंबर २०२२ रोजी शेवटचा हप्ता थकल्याने कंपनीने तक्रारदाराकडे प्रतिनिधी पाठवले. त्यांनी तक्रारदाराला धमकी देत दुचाकी उचलून आणली. त्यामुळे तक्रारदार बंडू थोरे यांनी अॅड. भरत डोईफोडे यांच्या वतीने ग्राहक मंचात तक्रार अर्ज दाखल केला. प्रकरणाच्या सुनवाणीअंती ग्राहक मंचाने तक्रारदाराला दुचाकीचा पाच हजार रुपयांचा हप्ता कंपनीत भरणा करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबरच तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश कंपनीला दिले.
COMMENTS