मुंबई ः आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल’ च्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चित्रपट बराच चर्चेत आला आहे. चित्रपटात आयुष्मानने पूजा नावाच्या म...
मुंबई ः आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल’ च्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चित्रपट बराच चर्चेत आला आहे. चित्रपटात आयुष्मानने पूजा नावाच्या मुलीचे पात्र साकारले होते, आयुष्मानने मुलीच्या आवाजात बोलत अनेक तरुणांना चित्रपटात घायाळ केले होते.
गेल्या काही दिवसांपुर्वी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. नुकताच चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाबद्दल आणखी एक नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, ड्रीम गर्ल २’च्या टीझरमध्ये, बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा उल्लेख करण्यात आला आहे. नुकताच अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. आयुष्मानने शेअर केलेल्या टीझरमध्ये, आयुष्मान खुराना पूजाच्या भूमिकेत दिसत असून पुजा भाईजानसोबत फोनवर बोलताना दिसत आहे.
मात्र, हा रियल सलमान नसून पुजाच्या प्रेमात दिवाना झालेला सलमान आहे. शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, पुजाला सलमान म्हणतो, भाई मी दुसर्यांसाठी आहे तुझ्यासाठी मी फक्त जान आहे. तुझ्यामुळे आजपर्यंत मी लग्न केलेलं नाही. असं टीझरमध्ये सलमान त्या पुजाला म्हणतो. टीझरमध्ये, सलमान खानने पूजाला चेहरा दाखवण्यासाठी व्हिडीओ कॉल करताच लाइट गेली. ड्रीम गर्ल २’चा हा मजेशीर टीझर सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
COMMENTS