पुणे नगर सह्याद्री : ७०० ते ८०० वर्षपूर्वीचे हेमांडपंथी असलेले पुण्यातील महादेवाचे वाघेश्वरावाचे वर्षातील फक्त तीन ते चार महिनेच दर्शन घेत...
पुणे नगर सह्याद्री :
७०० ते ८०० वर्षपूर्वीचे हेमांडपंथी असलेले पुण्यातील महादेवाचे वाघेश्वरावाचे वर्षातील फक्त तीन ते चार महिनेच दर्शन घेता येत व इतर आठ महिने हे मदिर पाण्याखाली असते. या मंदिराचे विशेष म्हणजे हे मंदिराचा शिवाजी महाराज यांच्याशी संबंध आहे. तीन ते चार महिनेच दर्शनासाठी खुले असलेले हे मंदिर आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. पुणे जिल्यातील मावळा या ठिकाणी असणाऱ्या या मंदिरातील महादेवाचे बऱ्याच
कालावधीनंतर भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन करता येणार आहे. ऐतिहासिक संदर्भाचे हे मंदिर पावना धरणात आहे. पावना धरण १९६५ साली बाधण्यात आले होते. १९७१ रोजी या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली होती. धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला लागले. पावसाळ्यात या धरणात मोठया प्रमाणात पाणी जमा होत असल्याने हे मंदिर पावसाळा आणि नंतरचे चार असे आठ महिने पाण्याखाली असते. हे मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मोठया प्रमाणावर भाविक येतात.
उन्हाळ्यात फक्त तीन ते चार महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते. यंदा मार्चअखेर हे मंदिर पाण्याबाहेर आलं आहे. संशोधनानुसार या मंदिराचे बांधकाम ११ किंवा १२ व्या शतकात झाले असावे. कारण मंदिरासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आले आहेत. तसंच, मंदिरात काही शिलालेखही आढळले आहेत. या मंदिराचे बाधकाम दगडात केलेले असून आता मंदिराचा फक्त ढाचाच शिल्लक आहे. पुरातन मंदिर असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर, आजूबाजूच्या भिंतीचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत.
मंदिराचा कळस ढासळला आहे. फक्त गाभारा सध्या सुस्थितीत आहे. या मंदिराच्या चारही बाजूने भिंतींना भेगा पडल्या आहेत. काही अवशेष शिल्लक आहेत. कोकण-सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा व कठीणगड (तुंग) किल्यावर आले, की आवर्जुन येथे दर्शनाला येत असत, असंही सांगितले जाते. सध्या या मंदिराची पडझड झाली आहे. पुरातत्व विभागाने मंदिराचे संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.v
COMMENTS