एसटी स्टॅण्ड परिसरात रीक्षा चालकांसाठी आ. संग्राम जगताप यांच्या निधीतून काँक्रीटीकरण अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहरातील प्रत्येक घटकाचे प...
एसटी स्टॅण्ड परिसरात रीक्षा चालकांसाठी आ. संग्राम जगताप यांच्या निधीतून काँक्रीटीकरण
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी विविध विकास कामांच्या माध्यमातून नगरच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरातील विविध भागातील प्रलंबित कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देत कामे मार्गी लावले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण झाले असल्याने नगर शहर खड्डेमुक्त होत आहे. त्याचबरोबर ड्रेनेज, पाणी, स्ट्रीट लाईट आदिंचीही कामे झाल्याने एक परिपूर्ण विकसित शहर निर्माण होत आहे. चांगल्या सुविधा निर्माण झाल्यास रोजगाराच्याही संधी उपलब्ध होत असतात. एस.टी. स्टॅण्ड परिसर जिल्ह्याचे केंद्रस्थानी असल्याने या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांना सोयी-सुविधा मिळाल्याने त्यांचा फायदा सर्वांच होणार असल्याचे प्रतिपादन, आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅसी चालक मालक संघटनेच्या प्रयत्नाने आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून पुणा स्टॅण्ड येथील रिक्षा स्टॉपसाठीच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ता वामन, कार्याध्यक्ष विलास कराळे, सरचिटणीस अशोक औशिकर, सुधाकर साळवे, नासिर खान, गणेश आटोळे, चंदू औशिकर, किशोर कुलट, पोपट कांडेकर, शंकर निस्ताने, सुनिल तुरे, वसंतराव गायकवाड, लक्ष्मण शिंदे, राजू शेख, जुनेद बागवान, सुभाष भागानगरे, बाळासाहेब भिंगारदिवे आदि उपस्थित होते. यावेळी अविनाश घुले म्हणाले, नगरच्या विकासासात प्रत्येक नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. प्रत्येकाला सोयी-सुविधा देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. त्याचबरोबर रिक्षा संघटनेच्या प्रश्नांसाठी विविध पातळींवर प्रयत्न करुन अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
आज या ठिकाणी कॉक्रीटीकरण झाल्याने रिक्षा-टॅसी चालकांना हक्काची जागा उपलब्ध झाल्याने नागरिक, प्रवासी यांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा मिळणार आहेत. रिक्षा-टॅसी चालकांनीही नियमांचे पालन करुन नागरिकांना चांगल्या सेवा द्यावी, असे आवाहन केले. याप्रसंगी गणेश भोसले, प्रकाश भागानगरे आदिंनी मनोगातून शहराच्या विकासात लोकप्रतीनिधीं महत्वाची भुमिका बजावत आहेत. रिक्षा-टॅसी चालकांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.संग्राम जगताप व अविनाश घुले करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तविकात उपाध्यक्ष दत्ता वामन यांनी रिक्षा-स्टॉपसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांच्यासह सर्वांचे आभार मानून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.
COMMENTS