नागपूर। नगर सहयाद्री - नागपूर मधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. धंतोली परिसराताल एका रुग्णालयात अर्धांगवायूचा उपचार घेत असलेल्या ७५ वर्षी...
नागपूर। नगर सहयाद्री -
नागपूर मधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. धंतोली परिसराताल एका रुग्णालयात अर्धांगवायूचा उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय महिलेवर रुग्णालयात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धंतोली पोलिसांनी दीपक ठाकरे या आरोपीला अटक केली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या, महिलांवरील अत्याचार आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता राज्यातील नागपूर येथून आणखी एक संतापजनक बातमी समोर आली आहे.
तीन दिवसांपूर्वी महिलेला लकवा मारल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दीपक हा वृद्धेच्या मुलाचा मित्र आहे.दीपक त्यांच्याकडे आठ ते नऊ वर्षांपासून काम करीत असल्याने त्यांच्या मुलाशी त्याची मैत्री होती. त्यातून तोही रुग्णालयात त्याच्यासोबत आला होता. मुलगा आपल्या आईसाठी औषधी आणण्यासाठीबाहेर गेला होता. त्यावेळी त्याने आईची काळजी घेण्यास दीपकला सांगितले. त्यामुळे दीपकने दार लावून घेतले. बेशुद्ध अवस्थेत असताना दीपकने तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान रुग्णालयातील परिचारिका वृद्धेला औषध देण्यासाठी आली असता तिला हा प्रकार दिसून आला. तिने आरडा-ओरड केला आणि अन्य कर्मचारी खोलीत आले. त्यांनी दीपकला पकडून चोप दिला. दरम्यान हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीवरुन धंतोली पोलिसांनी दीपकला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
COMMENTS