पारनेर| नगर सह्याद्री पारनेर तालुयातील भाळवणी परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वारे, गारांच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून ठि...
पारनेर| नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील भाळवणी परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वारे, गारांच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
भाळवणी - नगर रोड परिसरात तसेच भाळवणी - गोरेगाव रोडच्या परिसरातही झाडे पडली असून भाळवणी येथील बाजारतळाजवळील श्री नागेश्वर इलेट्रिक दुकानाशेजारी असलेले वडाचे झाड उन्मळून पडले. या झाडाखाली असलेल्या एक मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या वादळी पावसाने गहू, कांदा, वाटाणा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
COMMENTS