जागृत देवस्थान मंळगंगा देवीचा यात्रेला गुरुवारपासून सुरूवात . निघोज। नगर सहयाद्री - निघोज येथील जागृत देवस्थान असलेल्या मंळगंगा देवीची मुख्...
जागृत देवस्थान मंळगंगा देवीचा यात्रेला गुरुवारपासून सुरूवात .
निघोज। नगर सहयाद्री -
निघोज येथील जागृत देवस्थान असलेल्या मंळगंगा देवीची मुख्य यात्रा उत्सवास बुधवार दि. ५ रोजी मंळगंगा देवीला हळद लावून यात्रा उत्सवाची सुरुवात करण्यात आली. गुरुवार दि. ६ रोजी दुपारी चार वाजता मंळगंगा देवीच्या ८५ फूट उंचीच्या सजवलेल्या काठीची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.
मंळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषनांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंळगंगा देवीची हेमांडपंथी बारव, संदिप पाटील चौक, ग्रामपंचायत चौक, तसेच जुनी पेठ ते मंळगंगा मंदीर अशाप्रकारे ही मिरवणूक काढण्यात आली. तब्बल दोन तास ही मिरवणूक सुरू होती.
यात्रा उत्सव गुरूवार दुपारी बगाड गाडा मिरवणूक, देवीला अंबील वर्तविणे, देवीच्या छबिण्याची मिरवणूक, देवीच्या हेमांडपंथी बारवेमध्ये घागर दर्शन, शुक्रवार सकाळी ७ वाजता घागरीची सवाद्य मिरवणूक, पालखीची मिरवणूकीनंतर यात्रेला सुरूवात होते. शनिवारी कुस्ती हगामा होणार आहे. हगाम्यासाठी राज्यातील नामवंत पैलवान सहभागी होत असतात. अशाप्रकारे तब्बल चार दिवस ही यात्रा संपन्न होत आहे.
यात्रा संपल्यानंतर लगेच हजरत शहा मदार कादरी यांचा उरुस संपन्न होत असतो. संदल मिरवणूकीने कादरी बाबा यांना चादर चढवण्यात येणार आहे. उरुस निमित्ताने छबिणा मिरवणूक, त्यानंतर प्रसीद्ध लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा तमाशा होणार आहे. ग्रामपंचायत, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज व मुंबईकर मंडळ , मुस्लिम समाज मंडळ,या यात्रेचे व उरुसाचे नियोजन करीत असतात. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेली ही यात्रा व उरुस दिवसेनदिवस नावलौकिक मिळवीत असून लाखो भावीकांची मांदियाळी पहाण्यासारखी असते.
COMMENTS