मुंबई। नगर सहयाद्री रॅपर एमसी स्टॅनने क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळून आपल्या चाहत्यांना भलतंच आनंदी केलं आहे. या दोघांचा व्हिडिओ स...
मुंबई। नगर सहयाद्री
रॅपर एमसी स्टॅनने क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळून आपल्या चाहत्यांना भलतंच आनंदी केलं आहे. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एमसी स्टॅनने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सचिनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस १६' जिंकल्यापासून एमसी स्टॅन हे नाव घराघरात प्रसिद्ध झालं. त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतरही तो सतत चर्चेत असतो. आता त्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सचिनसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एमसी स्टॅनचे चाहते खूप खूश झाले असून ते याला 'एपिक मोमेंट' म्हणत आहेत.
स्टॅनने गुरुवारी त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो क्रिकेटचा देव सचिनसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावेळी रॅपरने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. सर्व-काळ्या पोशाखात गोलंदाजी करताना दिसला आणि काळ्या गॉगलने स्टॅनने त्याचा लूक पूर्ण केला. फलंदाजी करताना सचिन तेंडुलकर नेहमीप्रमाणे साध्या पण आकर्षक लूकमध्ये दिसला. त्याने साधा लाल शर्ट आणि क्रीम पॅन्ट घातली होती. एमसी स्टॅनने नंतर क्रिकेटपटूसोबतचे फोटोही पोस्ट केले आणि त्यांना कॅप्शन दिले की, 'दिग्गज सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव. खूप कृतज्ञ.
COMMENTS