मुंबई। नगर सहयाद्री - बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून किसी का भाई किसी की जान या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चि...
मुंबई। नगर सहयाद्री -
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून किसी का भाई किसी की जान या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना बाॅक्स आॅफिसवर दिसत आहे. सलमान खान याच्या या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. शहनाज गिल हिचा अभिनय प्रेक्षकांना आवडलाय.
सलमान खान याने नुकताच इंडिया टिव्हीला एका मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सलमान खान थेट म्हणाला की, मला लहान मुले प्रचंड आवडतात आणि मला बाप होण्याची खूप जास्त इच्छा आहे. मात्र, त्यासाठी भारतामधील लाॅ परवानगी देत नाही. कारण मुले म्हटले की, त्यांची आई देखील आलीच की…
सलमान खान हा पुढे म्हणाला, आता काय सांगू, माझा तो अगोदरचा प्लान होता. सुनेचा नाही तर लेकऱ्यांचा होता. मात्र, आता तो भारताच्या कायद्यानुसार अजिबात होऊ शकत नाही, त्यामुळे आता काय करणार ना…मी करण जोहरसारखेच करण्याचे ठरवले होते, मात्र, आता त्या कायद्यामध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे हे सर्व करणे शक्य नाहीये.
COMMENTS