चेन्नई | वृत्तसंस्था- काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे क्रिकेट चाहते आयपीएल २०२३ चा आनंद लुटत असतानाच आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा कॅप्टन क...
चेन्नई | वृत्तसंस्था-
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे क्रिकेट चाहते आयपीएल २०२३ चा आनंद लुटत असतानाच आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या टीम चेन्नई सुपर किंग्जवर असताना तामिळनाडूच्या एका आमदाराने या संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
धर्मपुरी, तामिळनाडू येथील पीएमके आमदार एसपी व्यंकटेश्वरन यांनी आयपीएल फ्रँचायझीकडे कोणतेही स्थानिक खेळाडू नसल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जवर (सीएसके) बंदी घालण्याची राज्य सरकारला मंगळवारी विधानसभेत क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या अनुदानाच्या मागणीदरम्यान केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मोठ्या संख्येने तरुण आयपीएलचे सामने पाहतात. चेन्नई तामिळनाडूची राजधानी आहे.
आमचे नेते अय्या (डॉ. रामादोस) यांनी इन सर्च ऑफ तमिळ ही मोहीम तरुणांमध्ये तमिळ भाषेच्या रक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरू केली आहे. अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितले की, संघाचे नाव चेन्नई असे असूनही हा संघ प्रतिभावान स्थानिक खेळाडूंना संधी देत नाही म्हणून या संघावर बंदी घातली पाहिजे.
COMMENTS