जळगाव। नगर सहयाद्री - जळगाव मधील वडलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४० वर्षीय महिलेस तिच्याच मुलाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. ...
जळगाव। नगर सहयाद्री -
जळगाव मधील वडलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४० वर्षीय महिलेस तिच्याच मुलाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला आहे.अक्काबाई सुभाष भिल असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा जितेंद्र भिल याला पोलिसांनी अटक केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, अक्काबाई सुभाष भिल आपल्या दोन मुला जितेंद्र सुभाष भिल व अजय सुभाष भिल यांच्यासह वास्तव्यास होती. सोमवारी एका लग्ना निमित्त संपूर्ण वाडा लग्नात सहभागी झाला होता. कुणीतरी आईच्या वागण्याबात जितेंद्र व अजय यांना माहिती दिली. मामा अरुण याला घेऊन जितेंद्र व अजय रात्री पावणेअकराला अंबर करणसिंग भिल याच्या घरी धडकले.
तिघांनी अंबर करणसिंग याच्या घराचे दार उघडले. आत शिरताच अक्काबाई नको त्या अवस्थेत सापडून आली. जितेंद्र भिल याने लोखंडी सळईने आईवर हल्ला चढविला. गंभीर जखमी अक्काबाई बेशुद्ध पडली, तर अंबरनी घरातून धूम ठोकली. जखमी अक्काबाईला तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चार दिवसांपासून उपचार सुरू असताना, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास अक्काबाईचा मृत्यू झाला. याबाबत मृत अक्काबाई भिल हिचा भाऊ अरुण भिल (वय ३६, रा. वडली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयित जितेंद्र भिल यास पोलिसांनी अटक केली आहे.
COMMENTS