मुंबई | नगर सह्याद्री ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्राला पुन्हा तडाखा दिला. राज्यभरातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, प...
मुंबई | नगर सह्याद्री
ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्राला पुन्हा तडाखा दिला. राज्यभरातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पाऊस बरसला. विविध ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान ८ ते १० एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्रात वादळी वार्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. सिल्लोड तालुयात वीज पडून एकाचा तडाख्यात मृत्यू झाला. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात वीज पडून ३ जण, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. या पावसामुळे पपई, खरबूज, आंबा, संत्रा, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले. कोल्हापुरात एक जणाचा मृत्यू झाला.बहिणीच्या भेटीसाठी जात असताना अंगावर वीज पडून अंबादास भिका राठोड (२७, रा. वरसाडे तांडा, ता. पाचोरा, जि. जळगाव) याचा मृत्यू झाला. ही घटना सिरसाळा तांडा (ता. सिल्लोड) येथे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. जामनेर, एरंडोल, चाळीसगाव तालुयांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे मका, केळी, सूर्यफुलाचे पीक खाली पडले. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, बार्हे, उंबरठाण, बोरगाव, सराड, काठीपाडा, मोहपाडा भागात दुपारी विजेच्या कडकडाटासह १५ ते २० मिनिटे पाऊस झाला.विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. काही जिल्ह्यांत गारपीटही झाली. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या विविध घटनांत ३ ठार, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. मृतांत गोपाल करपती (४२), गोपाल महादेव कवळे (३०) यांचा समावेश आहे. जनावरांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे पपई, खरबूज, आंबा, संत्रा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
३ दिवस वादळी पाऊस
राज्यभरात ८ ते १० एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात १० एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल. तर, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शयता आहे. पालघर, ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावण्याची शयता आहे.
COMMENTS