अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरात अवैध गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरात अवैध गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा ९० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सागर एकनाथ आवसरे (वय २६ रा. गाडेकर चौक, पत्राचाळ, निर्मलनगर), मनोज लक्ष्मण झगरे, (वय ३१ रा. गुंडू गोडावुन मागे, तपोवन रोड) असे जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार तपोवन परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी अवसारे व झगरे येणार असल्याचे समजले.
त्यानुसार कटके यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. सहायक निरीक्षक वारूळे यांनी अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, सुनील चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापू फोलाणे, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, भीमराज खर्से, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांना सोबत घेत वेशांतर करून सापळा लावला. दोघांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.
COMMENTS