अहमदनगर | नगर सह्याद्री नागापूर कमानीत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून दोन लाख ७६ ह...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नागापूर कमानीत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून दोन लाख ७६ हजार ५८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दीपक निळकंठ घाटे (वय ४० रा. नागापूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार नागापुर कमानीजवळ दीपक घाटे बिंगो जुगार लोकांकडुन पैसे घेऊत आकड्यावर पैसे लावून खेळत व खेळवित असल्याचे समजले. निरीक्षक सानप यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने बातमीतील नमूद ठिकाणी जावून अचानक छापा टाकला असता, एक इसम समोर एलसीडी स्क्रीन लावलेली व त्याचे समोर तीन ते चार लोक उभे असलेले दिसले. पोलीस पथकाने छापा टाकला असता उभे असलेल्या लोकांनी पोलीस आल्याचे पाहुन पळुन गेले. दीपक निळकंठ घाटे पोलिसांच्या ताब्यात सापडला.
रोख रक्कम, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा दोन लाख ७६ हजार ५८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सानप, पोलीस अंमलदार पांढरकर, आंधळे, सानप यांच्या पथकाने केली.
COMMENTS