अहमदनगर / नगर सह्याद्री नामदेव समाजोन्नती परिषद व अक्षय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेव समाजोन्नती परिषद ११६ व्या वर्धापनदिन निमि...
अहमदनगर / नगर सह्याद्री
नामदेव समाजोन्नती परिषद व अक्षय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेव समाजोन्नती परिषद ११६ व्या वर्धापनदिन निमित्त बालरोग निदान व स्त्री रोग निदान व मार्गदर्शन शिबीराचे आयोजक केले असल्याची माहिती ना.स.प.जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांढरे यांनी दिली.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रात नामदेव समाजोन्नती परिषद चा ११६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे,अहमदनगर जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषद च्या वतीने पण सोमवार दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी ११६ वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने शिंपी समाजाचे नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉ.श्री.अनिरुद्ध गिते व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.सौ.उर्मिला गिते यांच्या 'अक्षय' हॉस्पिटल कॉस्मिक सोसायटी शेजारी,बालकाश्रम रोड, अहमदनगर व नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सकाळी १०:३० ते दुपारी ०२:०० या वेळेत आयोजन करण्यात आले नवजात अर्भक ० ते १५ वयोगटातील मुलांसाठी सर्व रोग निदान व मार्गदर्शन व स्त्री वंध्यत्व,निदान व मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी सर्व अहमदनगर जिल्हा व तालुक्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ना.स.प चे जिल्हा सचिव शैलेश धोकटे यांनी केले आहे.
COMMENTS