श्रीगोंदा | नगर सह्याद्री चार-पाच महिने पाणी भरून तळ हाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेला कांदा काढून श्रीगोंदा बाजार समिती मध्ये आणला. त्या का...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
चार-पाच महिने पाणी भरून तळ हाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेला कांदा काढून श्रीगोंदा बाजार समिती मध्ये आणला. त्या कांद्याला बाजार भाव नसल्याने कांदा उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांचा कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.
शेतात राब राब राबवून कष्ट करून पदरात काहीच पडत नसल्याने आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून श्रीगोंदा तालुयात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गारपीट व वादळी वार्यासह अनेक छोटी मोठी पिके हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले. काढणीला आलेला कांदा शेतकरी काढून श्रीगोंदा बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहे. परंतु कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकर्याच्या हातात कवडीमोल किंमत मिळत आहे. त्यातच अनेक शेतकर्यांचा कांदा गारपीट, वादळी वार्यासह झालेल्या पावसाने खराब झाला आहे.
रुई गव्हाण येथील शेतकरी संतोष जामदार यांनी १३ गोण्या कांदा श्रीगोंदा बाजार समिती विक्रीसाठी आणल्या होत्या. भाडे हमाली, मापाई व इतर खर्च वजा होता त्यांच्या हातात अवघे ११३३ रुपये कांदा पट्टी आडत्याने दिली. कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांद्याला योग्य तो भाव न मिळाल्याने काही शेतकर्यांनी कांद्याच्या शेतामध्ये ट्रॅटर फिरवला आहे. काही शेतकर्यांनी कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
दोन पैसे मिळतील या आशेपोटी काही शेतकरी कांदा बाजारात आणत आहे. परंतु, त्यांच्याही पदरात काही पडत नाही. दरम्यान एकीकडे कांद्याला बाजार नाही. आणि दुसरीकडे सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर जाहीर केले आहे. परंतु शासनाच्या जाचक अटीमुळे ते शेतकर्यांच्या पदरात पडेल की नाही याची शाश्व़ती नाही. त्यामुळे शेतकरी ही दुहेरी संकटात सापडला आहे.
COMMENTS