मुंबई | नगर सहयाद्री अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे ओळखी जाते. विशेष म्हणजे उर्फ...
मुंबई | नगर सहयाद्री
अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे ओळखी जाते. विशेष म्हणजे उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसाठी अत्यंत बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. उर्फी आणि वाद हे समीकरण सतत बघायला मिळते. उर्फीवर अनेकदा तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. मात्र तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. उर्फीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. उर्फी जावेद हिच्या व्हिडीओवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये उर्फी अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसते. आता उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसत आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी ही पांढर्या रंगाचा लांब शर्ट घालून उभी आहे. मात्र, त्यानंतर उर्फी जावेद टाळी वाजवते आणि तिचा शर्ट खाली पडतो आणि असे करून तो पुर्ण शर्ट बाजूला होतो. मग काळ्या कपड्यांमध्ये उर्फी दिसते. यामध्ये उर्फी जावेद हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही हॉट फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, हा नेमका कोणता प्रकार आहे उर्फी.
दुसर्याने लिहिले की, ही उर्फी जावेद कधी काय करेल याचा आता अजिबात नेम राहिला नाही. तिसर्याने लिहिले की, मला तर उर्फी जावेद हिचा हा लूक खूप जास्त आवडलाय. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने अत्यंत बोल्ड फोटोशूट केले होते. उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वी तिच्या कपड्यांमुळे एका ब्रोकरणे थेट बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्या ब्रोकरचे नावही जाहिर केले. त्यानंतर पोलिसांनी ब्रोकरला बिहारमधून अटक केली. थेट शर्ट न घालता उर्फी जावेद हिने एक फोटोशूट केले होते.
COMMENTS