पुणे। नगर सहयाद्री - पुण्यामधील मुंढव्यातील केशवनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला भेटायला म...
पुणे। नगर सहयाद्री -
पुण्यामधील मुंढव्यातील केशवनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला भेटायला मुंबईहून पुण्यात आला. मात्र, त्याने गर्लफ्रेंड ऐवजी तिच्या मैत्रिणीबरोबरच अश्लिल वर्तन करुन विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच एक मुंढव्यातील केशवनगरमधील एका सोसायटीत हा प्रकार घडला. फिर्यादी तरुणी ही तिच्या मैत्रिणीसोबत एकाच रममध्ये भाड्याने राहत होती. पीडित तरुणी येरवडा येथील एका कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. मैत्रिणीचा बॉयफ्रेंड अजिंक्य सावंत हा तिला भेटायला मुंबईहून पुण्यातआला होता.
७ एप्रिल रोजी पीडितेच्या मैत्रिणीचा प्रियकर अजिंक्य रमेश रात्री 10.30 वाजता त्यांच्या फ्लॅटवर आला. पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या प्रियकराची इतरांशी ओळख करून दिली. 8 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता पीडिता झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली. सकाळी 7.30 वाजता तिला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. ती उठली आणि तिच्या समोर अजिंक्य नग्न अवस्थेत उभा असल्याचे तिला दिसले.
फिर्यादीस स्पर्श करुन तिच्या अंगावर पडला. त्याला विरोध करताच मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे. पीडितेने तात्काळ खोली सोडली आणि तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि तातडीने ही बाब पोलिसांना कळविली.याप्रकरणी एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस (Police) ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अजिंक्य सावंत याला अटक केली आहे.
COMMENTS