नाशिक। नगर सहयाद्री - नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आहे. मोबाईलच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्य...
नाशिक। नगर सहयाद्री -
नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आहे. मोबाईलच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात अली आहे. नितीन गणपत जाधव (वय ३०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तीन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नितीन गणपत जाधव (वय ३०) यास एक मोबाईल सापडला होता. हा मोबाईल घेण्यासाठी आलेल्या निलेश दिनकर ठोके (३३ कामाठवाडे), त्याचा साथीदार प्रसाद शिरीष मुळे व अन्य एका साथीदाराने या तरुणाला जबर मारहाण केली होती. तू माझ्या पत्नीस फोन का करतो असे म्हणत लोखंडी रॉडच्या साह्याने मारहाण केली होती.
मारहाणीत नितीन गणपत जाधव हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार घेत असताना २३ एप्रिल रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत नितीन जाधव यांचे वडील गणपत जाधव यांच्या फिर्यादीहून अंबड पोलीस ठाण्यात संशयित तीन आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS