तातडीने पंचनामे करण्याचे अधिकार्यांना आदेश पारनेर | नगर सह्याद्री- तालुयात वादळी वार्यासह गारपीटीत पळशी येथील भाऊ सरोदे यांच्या दोन एकर का...
तातडीने पंचनामे करण्याचे अधिकार्यांना आदेश
पारनेर | नगर सह्याद्री-
तालुयात वादळी वार्यासह गारपीटीत पळशी येथील भाऊ सरोदे यांच्या दोन एकर कांद्याचे मोठे नुकसान झाले. तसेच पळशी, खडकवाडी, गाजदीपूर, नागापूरवाडी याठिकाणी झालेल्या वादळी वार्यासह गारपिटीमुळे कांद्या, टॉमेटो, गहू, हरभरा, वाटाणा, मका, खरबूज, टरबूज इतर रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकार्यांकडून आढावा घेत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यांचे आदेश देण्यात आले.
पाहणी दौर्यात पळशी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये पारनेर तालुयात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचे पंचनाम्याच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित होते. या संबंधीची कैफियत अनेक शेतकर्यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे मांडली. याबाबत महसूलमंत्री विखे पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना विचारणा केली.
अधिकार्यांकडून काही मंडळाचे अनुदान जमा झाले आहेत तर काही मंडलांचे अनुदान लवकरच जमा होईल, असे सांगण्यात आले. यावेळी स्थानिक महिलांसह ग्रामस्थांनी वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे पोल पडले, घरांची पत्रे उडाली आहेत, त्यामुळे अनेक असुविधा निर्माण झाल्या आहे. या सुविधा तातडीने पूर्ववत कराव्या तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाची तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.
यावेळी महसूल मंत्री विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धीराम सालीमठ, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, संजीव भोर, सुजित झावरे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, गटविकास अधिकारी किशोर माने, डॉ. नितीन रांधवन, सरपंच प्रकाश राठोड, सुभाष गांधी, उपसरपंच दत्तात्रय पवार यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS