मुंबई। नगर सहयाद्री - महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे आज निधन झाले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल...
मुंबई। नगर सहयाद्री -
महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे आज निधन झाले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.महिंद्रा समूहाचे ४८ वर्षे नेतृत्व केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी अध्यक्षपद सोडले.
केशब महिंद्रा यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९२३ रोजी शिमला येथे झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कॉर्पोरेट जगतात शोककळा पसरली आहे. वयाची शंभरी पार करण्यापूर्वीच ते अब्जाधीशांच्या यादीत पुनरागमन करत ते भूतकाळात चर्चेत राहिले होते आणि काही दिवसांनंतर त्यांच्या मृत्यूची बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दिवंगत केशब महिंद्रा यांनी १९४७ मध्ये वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली, ज्यानंतर १९६८ मध्ये त्यांना महिंद्रा ग्रुपचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. केशब महिंद्रा हे उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे काका होते आणि ते आतापर्यंत महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष एमेरिटस होते. २०१२ मध्ये ग्रुप चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांच्याकडे समूहाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
COMMENTS