सारथी, एमकेसीएलतर्फे मराठा व कुणबी समाजातील २० हजार युवक-युवतींना मोफत कौशल्यविकास प्रशिक्षण निघोज | नगर सह्याद्री- विद्यार्थी व युवकांना आज...
सारथी, एमकेसीएलतर्फे मराठा व कुणबी समाजातील २० हजार युवक-युवतींना मोफत कौशल्यविकास प्रशिक्षण
निघोज | नगर सह्याद्री-
विद्यार्थी व युवकांना आजच्या स्पर्धेत ध्येय साध्य करायचे असेल, तर पुस्तकी ज्ञानाबरोबर कौशल्याधारीत, माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करणे काळाची गरज आहे. मंळगंगा कॉम्प्युटर माध्यमातून यश शेटे व त्यांच्या सहकार्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि चघउङ ने उडचड-ऊएएझ या नावाने मोफत संगणक कौशल्यविकास प्रशिक्षण हा ६ महिन्याचा डिप्लोमा कोर्स सुरु केला आहे. या सेवेचा प्रारंभ आ. नीलेश लंके यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करुन करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्यविकास प्रशिक्षणास पारनेर तालुयाचे आ. नीलेश लंके यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी सरपंच ठकाराम लंके, मळगंगा पतसंस्थेचे मॅनेजर दिलीप वराळ, संपदा पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव वराळ, ग्रा. पं. सदस्या सुधामती कवाद, विठ्ठल कवाद, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, लोकनेते नीलेशजी लंके प्रतिष्ठान पदाधिकारी बाळासाहेब लंके, डॉ. बाळासाहेब लामखडे, संचालिका प्रियांका शेटे, निखील कवडे, मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्रवीण जाधव, विकास शेटे, साई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष मंगेश लंके, निखिल शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी आ. लंके यांनी कोर्समध्ये भाग घेतलेल्या युवक-युवतींचे अभिनंदन केले. त्यांना विविध संगणकीय कौशल्ये शिकून नोकरीसाठी, स्वयं व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
चघउङ चे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. दीपक पाटेकर यांनी म्हणाले, प्रशिक्षाणार्थीना विविध डिजिटल कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स आणि इंग्लिश यावर प्रभुत्व मिळवून विकसित केले जाणार आहे. व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी साहाय्य केले जाणार आहे. अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासांचे ४ मोड्यूल्स असतील, सहा महिन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींनी नियमित उपस्थित राहून हा मोफत अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे, तसेच कोर्स व अभ्यासक्रमा संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक गणेश आठरे यांनी एमकेसीएल चे विविध लिक डिप्लोमा कोर्सेस व एमकेसीएल तर्फे भविष्यात राबवल्या जाणार्या विविध योजना विषयीची माहिती दिली. यावेळी मळगंगा कंप्यूटर्स चे संचालक यश शेटे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व सारथी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. तसेच १०वी व १२वी तील विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी महाराष्ट्र शासनाच्या या कॉम्प्युटर कोर्सला व एमकेसीएलच्या विविध जॉब रेडी कोर्सेसला प्रवेश सुरु आहे. व विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
COMMENTS