नागपूर । नगर सहयाद्री - नागपूर मधील म्हाडा कॉलनी मध्ये धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून उडी मार...
नागपूर । नगर सहयाद्री -
नागपूर मधील म्हाडा कॉलनी मध्ये धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून उडी मारत १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. स्नेहा पंकज शर्मा (वय १९, रा. म्हाडा कॉलनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, स्नेहाचे वडील खासगी कंपनीत काम करतात. तिच्या आईचे घरीच ब्युटी पार्लर असून तिला चार वर्षांचा भाऊ आहे. स्नेहा पंकज शर्मा, म्हाडा कॉलनी येथे वास्तव्यास आहे. नुकतीच स्नेहाने बारावीची परीक्षा दिली, सुट्ट्यांमध्ये एमएचसीआयटीच्या क्लास लावले होते. नेहमीप्रमाणे स्नेहा शुक्रवारी सकाळी क्लासला जाण्यासाठी घरून निघाली. क्लासमध्ये बॅग ठेऊन ती बेपत्ता झाली. ११.३० वाजताच्या सुमारास स्नेहाने क्लास समोरीलच पंचम अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेतली.
या धक्कादायक घटनेत ती खुप जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी धाव घेत तिला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. स्नेहा मनमिळाऊ स्वभाची व हुशार होती. शेजारी राहणाऱ्यांशी ती नेहमी आदराने बोलायाची. ती आत्महत्या करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. स्नेहाच्या आत्महत्येने शर्मा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
COMMENTS