अहमदनगर | नगर सह्याद्री - वाद झाल्याने तक्रार दाखल करण्यास आलेले तोफखाना पोलीस ठाण्यातच एकमेकांना भिडले. त्यांच्यातील वादामुळे पोलीस ठाण्यात...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
वाद झाल्याने तक्रार दाखल करण्यास आलेले तोफखाना पोलीस ठाण्यातच एकमेकांना भिडले. त्यांच्यातील वादामुळे पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही बाजुच्या लोकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अंमलदार शरद दाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी ही घटना घडली. अनिल कचरू वाकचौरे (वय ३६), सुनील कचरू वाकचौरे (वय २६), सुवर्णा अनिल वाकचौरे (वय २७), स्वाती सुनील वाकचौरे (वय २३, सर्व रा. एस. टी. वर्कशॉपसमोर, रामवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चौघे मंगळवारी दुपारी लहान मुलांचे खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादाची परस्परविरोधी फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आले होते.
तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होताच त्यांच्यात वाद झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. त्यानंतर दोन्ही बाजुच्या लोकांनी आम्हाला तक्रार द्यायची नाही, असे म्हणून निघून जात असताना पोलीस ठाण्याच्या गेटवरच सुवर्णा व स्वाती यांच्यात पुन्हा वाद होऊन हाणमार करू लागल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून चौघांना ताब्यात घेत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
COMMENTS