संगमनेर। नगर सहयाद्री - माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी मतदान प्रक्रिया पार पडली...
संगमनेर। नगर सहयाद्री -
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी मतदान प्रक्रिया पार पडली असून ९७ टक्के मतदान झालं आहे.आज मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल विरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पुरस्कृत पॅनल उभा केलेला होता.
संगमनेर बाजार समितीत अनेक वर्षापासून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची एकहाती असलेली सत्ता उलथून टाकण्यासाठी महसूल मंत्री विखे पाटलांनी विरोधात पॅनल स्थापन करत आपल्या उमेदवाराना रिंगणात उतरुन आव्हान दिले आहे. या निवडणुकीमध्ये थोरात -विखे असा संगर्ष पाहावयास मिळाली आहे. थोरात सत्ता कायम ठेवणार की विखे पाटील काही चमत्कार घडवणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
संगमनेर कृषी बाजार समिती : विखे-थोरातांच्या लढतीत अपक्षाची बाजी... हमाल मापाडी संघात अपक्ष उमेदवार सचिन कर्पे विजयी.
18 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
4 ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या
थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने उघडले खाते
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आहे एकहाती सत्ता
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( भाजप ) यांचे पॅनल पिछाडीवर
संगमनेर कृषी बाजार समितीत तिसऱ्या फेरीतही थोरातांच्या पॅनलची आघाडी आहे. तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे 3 तर 1 अपक्ष उमेदवाराने मारली.सर्वच्या सर्व 18 जागांवर थोरात गटाने निवडणूकीत विजय मिळविला. विखे पाटलांच्या गटास खातेही उघडता आले नाही. या निकालवरुन संगमनेरातील जनता थोरातांच्या पाठिशी असल्याचे दिसून आले. संगमनेर बाजार समितीवर थोरातांचा झेंडा फडकातच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
COMMENTS