अहमदनगर | नगर सह्याद्री अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पाकिस्तान व अंडरवर्ल्डशी संबंध असून याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस दिवसांत...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पाकिस्तान व अंडरवर्ल्डशी संबंध असून याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस दिवसांत कारवाई करावी. कारवाईस गृहमंत्री घाबरत असतील तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही सय्यद यांच्यावर गोळी झाडू, असे सामाजिक कार्यकर्ते व दिपाली सय्यद यांचे तत्कालीन स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.
ते म्हणाले, अभिनेत्री सय्यद यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे प्रशासनाला तीन महिन्यांपासून अनेक पुरावे दिले आहे. याबाबत ईडीकडे तक्रार केली आहे. सय्यद यांच्यावर कारवाई केली जात नसून त्यांना केंद्रातील दोन मंत्री मदत करतात. अभिनेत्री सय्यद यांचा पाकिस्तानशी संबंध असून याबाबत गृहमंत्री व ईडी कार्यालयाला पुराव्यासह निवेदन दिले आहे. अभिनेत्री सय्यद यांचे अंडरवर्ल्ड दाऊद यांच्या पत्नीशी संबंध आहेत.
गृहमंत्री फडणवीस त्यांच्यावर कारवाई करत नसून त्यांना पाठिशी घालण्यांचे काम भाजप सरकार करत आहे. येत्या २० दिवसांत अभिनेत्री सय्यद यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा गृहमंत्री फडणवीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही. कारवाईस मुख्यमंत्री, गृहमंत्री घाबरत असतील तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही अभिनेत्री सय्यद यांना गोळ्या घालून शिक्षा भोगायला तयार असल्याचा इशारा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
COMMENTS