उत्तर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी पवार | प्रवक्ते शिवानंद भानुसे यांची माहिती अहमदनगर | नगर सह्या द्री संभाजी ब्रिगेडच्या अहमदनगर दक्षिण जिल्ह...
उत्तर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी पवार | प्रवक्ते शिवानंद भानुसे यांची माहिती
अहमदनगर | नगर सह्याद्री
संभाजी ब्रिगेडच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश परकाळे यांची तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगडेचे प्रवक्ते, अहमदनगर पक्ष निरीक्षक शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान प्रवक्ते भानुसे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, शिवाजी पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी प्रदेश संघटन सचिव डॉ. संदीप कडलग, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, मराठा सेवा संघाचे विजय कुमार ठुबे, प्रा. पोपटराव काळे, माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीष जाधव आदी उपस्थित होते.प्रवक्ते भानुसे म्हणाले, २०१६ पासून पक्षीय संघटना म्हणून काम करत आहे. राज्यात जातीय दंगली थांबविण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले सक्षमपणे केले आहे. आगामी काळात येणार्या सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड लढवणार असून संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती केली आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास देशाची अवस्था श्रीलंका, पाकिस्तानसारखी होईल. देशात सर्वसामान्य लोकांचे सत्ताधार्यांना घेणे देणे नसून उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते.
नव्या जोमाने काम करणार
गेल्या २७ वर्षापासून संभाजी ब्रिगेड चळवळीचे काम करत असून आत्तापर्यंत सहा वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता पुन्हा वरिष्ठांनी जिल्हाध्यक्षपदाची काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात नव्या जोमाने काम करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी सांगितले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यकर्ता मेळावा तसेच दिवाळी दरम्यान १ लाख कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतमालाला हमी भाव, स्त्रीयांना सन्मान, युवकांचे प्रश्न, बेरोजगारी या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडने सातत्याने आवाज उठविला आहे. महापुरुषांची बदनामी सहन केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुका जवळ आल्या की जातीय दंगली धडविण्याचे काम केले जाते. आणि राजकीय पोळी भाजून घेतली जाते. आता हे सहन केले जाणार नसल्याचे ते म्हणाले. कडलग म्हणाले, गेल्या २५ वर्षापासून संभाजी ब्रिगेड हमीभाव व दारु मुक्त गाव हे ब्रीद वाक्य घेऊन लढा देत आहे. अन्याया विरुद्ध वाचा फोडण्याचे काम करत आहे. आगामी सर्व निवडणूका संभाजी ब्रिगेड लढवणार असल्याचे ते म्हणाले.
COMMENTS