ट्रॅव्हल्स ऑफीसमधील महिला कर्मचार्यास धक्काबुक्की;पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल अहमदनगर | नगर सह्याद्री- तु इथे काम करू नकोस, असे म्हणून आन...
ट्रॅव्हल्स ऑफीसमधील महिला कर्मचार्यास धक्काबुक्की;पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल
अहमदनगर | नगर सह्याद्री-
तु इथे काम करू नकोस, असे म्हणून आनंद ट्रॅव्हल्स ऑफीसमधील एका महिला कर्मचार्यास पाच जणांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना दि. ६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आरोपींमध्ये महिला व तिचा मुलगा तसेच इतर तीन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
या घटनेप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून रूपा चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही), करण चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. कोंंबडीवाला मळा, सोलापूर रस्ता) व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या जागेवर यापूर्वी काम करणार्या महिलेसही रूपा चव्हाण हिने वेळोवेळी त्रास देऊन मारहाण केली होती. त्यामुळे ती महिला काम सोडून गेली होती. दि. ६ रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी ऑफीसमध्ये काम करत असताना तिच्या मोबाईलवर रूपा चव्हाण हिने फोन करून तुला भेटायचे आहे.
तु तेथे काम कसे करते, तेच बघते असे म्हणाली. यासंदर्भात चव्हाण हिच्याविरूध्द कोतवाली पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्यानंतर फिर्यादी ऑफीसमध्ये काम करत असताना सायंकाळी ५ वाजता रूपा चव्हाण तिचा मुलगा करण चव्हाण व त्यांचे तीन साथीदार तेथे आले. रूपा चव्हाण हिने तु इथे काम करू नकोस असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर चव्हाण हिने हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली. करण चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी तुला पाहुन घेतो असे म्हणून धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.
COMMENTS