अहमदनगर | नगर सह्याद्री- नवीन घर घेण्यासाठी माहेरून २५ लाख रूपये न आणल्याने विवाहितेचा सासरी छळ करून तिला घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आ...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
नवीन घर घेण्यासाठी माहेरून २५ लाख रूपये न आणल्याने विवाहितेचा सासरी छळ करून तिला घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती अकिंत केवल दुग्गल, सासू रेखा केवल दुग्गल, सासरे केवल अत्तरचंद दुग्गल, दीर पुनीत केवल दुग्गल, जाऊ पुनम पुनीत दुग्गल (सर्व रा. मिस्कीननगर, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये फिर्यादीचा विवाह अकिंत दुग्गलसोबत झाला होता. काही दिवस फिर्यादीला सासरी व्यवस्थित नांदविले.
दरम्यान फिर्यादी व त्यांचे पती अकिंत यांच्यात वाद सुरू झाले. ‘तू जर घरच्यांना काही सांगितले तर तुला घराच्या बाहेर काढीन’, अशी धमकी देवून छळ सुरू झाला. हा प्रकार फिर्यादी यांनी सासू-सासरे, दीर व जाऊ यांना सांगितला असता त्यांनीही शिवीगाळ केली.त्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी पती अकिंतने फिर्यादीला नवीन घर घेण्यासाठी २५ लाख रूपये आणण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर त्यांना घराबाहेर काढले. फिर्यादी यांनी सुरूवातीला दिलासा सेलकडे तक्रार दिली होती. तेथे समझोता न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS