एसटी बस-बाईकमध्ये भीषण अपघात, पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू पुणे। नगर सहयाद्री - साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्...
एसटी बस-बाईकमध्ये भीषण अपघात, पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू
पुणे। नगर सहयाद्री -
साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघंही आई वडिलांची एकुलती एक लेकरं होती. त्यामुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अनिल नामदेव थोपटे -गायकवाड वय २५ वर्ष, पोपट अर्जन थोपटे -गायकवाड वय २३ वर्ष, ओंकार संजय थोपटे-गायकवाड वय २२ वर्ष अशी अपघातातील मृत्यांची नावं आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सर्वसामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातील हे तरुण. काहींनी नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते तर काही जण कॉलेजला जात होते. कामानिमित्त ते लोणंद या ठिकाणी गेले होते. मात्र घरी परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. लोणंद -निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस व निरेकडून लोणंद निघालेली मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांचे मृतदेह मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.सर्व गाव थोपटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले आहे. तिन्ही कुटुंबातील ही एकुलती एक मुलं असल्याने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
COMMENTS