नवी दिल्ली वृत्तसंस्था- पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार झाल्याची बातमी हाती आली आहे. गोळीबारानंतर कन्टॉन्मेट परिसराला सील करण्यात ...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार झाल्याची बातमी हाती आली आहे. गोळीबारानंतर कन्टॉन्मेट परिसराला सील करण्यात आले आहे. छावणी परिसरात झालेल्या घटनेनंतर परिसरात प्रवेश करण्यास मनाई आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये पहाटे ४ वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला आहे. मिलिट्री कॅम्प सील करून सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. स्टेशन क्विक रिअॅक्शन टिमला सक्रिय करण्यात आल्या आहेत.
COMMENTS