मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. भाजप हायकमांड नाराज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच पद जाणार,पदाची ...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. भाजप हायकमांड नाराज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच पद जाणार,पदाची आदला-बदल होऊन पुन्हा दवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार,राष्ट्रवादीकडुन भावी मुख्यमंत्री अजितदादा पवारच होणार अशा चर्चला उधाण आले आहे. अशातच एक बातमी समोर अली, काँग्रेस,राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे गटाचे १३ आमदारही एकनाथ शिंदे संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना उदय सामंत म्हणाले, ठाकरे गटात उरलेले १३ आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत. उदय सामंत यांनी केलेल्या गौप्यस्फोटमुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. अशा नव्या वक्तव्यामुळे चर्चांनी जोर धरला आहे.
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन पायउतार व्हावं लागणार असून राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून राज्यभरात 'अजित दादा भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर्स संपूर्ण राज्यभरात झळकवण्यात आले आहेत.
COMMENTS