कर्डिले-कोतकर गटाच्या दोन जागा बिनविरोध | १६ जागांसाठी ३५ उमेदवारी रिंगणात सुनील चोभे | नगर सह्याद्री - नगर बाजार समिती निवडणुकीतून उमेदवा...
कर्डिले-कोतकर गटाच्या दोन जागा बिनविरोध | १६ जागांसाठी ३५ उमेदवारी रिंगणात
सुनील चोभे | नगर सह्याद्री -
नगर बाजार समिती निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्याक्षणी कर्डिले-कोतकर गटाकडून व महाविकास आघाडीकडून अनेक मात्तबरांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे सांगितल्याने नाराजीनाट्य पहावयास मिळाले. कर्डिले-कोतकर गटाने तब्बल 15 संचालकांना उमेदवारी न देता नवख्या पण मातब्बर नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.. महाविकास आघाडीचा उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरुच होत. दरम्यान कर्डिले-कोतकर गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. तर एक जागा बिनविरोध होता होता राहिली. अखेर १६ जागांसाठी ३५ उमेदवारी रिंगणात राहिले आहेत.
संदीप कर्डिले झेडपीचे उमेदवार!
भाजप नेते शिवाजी कर्डिले यांचे पुतणे माजी बाजार समिती संचालक संदीप कर्डिले यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच उमेदवारीवरही दावा केला होता. परंतु, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सासरे माजी उपसभापती भाऊसाहेब काळे यांना उमेदवारी दिली. तसेच कर्डिले यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी जाहीर मेळाव्यात एक कर्डिले बाजार समितीचे उमेदवार तर दुसरे कर्डिले जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले होते. त्यानुसार संदीप कर्डिले हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवारी असतील असे बोलले जात आहे.
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी २२८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (दि.२०) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती.
सोसायटी मतदारसंघ-
भाऊसाहेब काळे, मधुकर मगर, सुधीर भापकर, संपतराव म्हस्के, विठ्ठल दळवी, केशव बेरड, संदेश कार्ले, अजय लामखडे, रभाजी सूळ, रोहिदास कर्डिले, उद्धव दुसुंगे, भाऊसाहेब भोर, सुभाष निमसे, संजय गिरवले, रामचंद्र शिंदे, राजू आंबेकर.
महिला राखीव -
आचल सोनवणे, मनिषा घोरपडे, सुरेखा कोठुळे, जयश्री लांडगे, संगिता ठोंबरे.
इतर मागास प्रवर्ग -
संतोष म्हस्के, शरद झोडगे.
विमुक्त जाती / भटक्या जमाती -
विठ्ठल पालवे, धर्मनाथ आव्हाड.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ -
अंकूश शेळके, भाऊसाहेब बोठे, शरद पवार, हरिभाऊ कर्डिले.
अनुसुचित जाती/ जमाती-
भाऊसाहेब ठोंबे, सुरेखा गायकवाड.
आर्थिक दुर्बल घटक-
प्रविण गोरे, दत्ता तापकिरे.
आडते / व्यापारी मतदारसंघ -
सुुप्रिया अमोल कोतकर (बिनविरोध)
राजेंद्र झुंबरलाल बोथरा (बिनविरोध)
हमाल/ मापाडी मतदारसंघ -
निलेश अशोक सातपुते
किसन लिंबाजी सानप
उमेदवारीचा गोंधळ शेवटपर्यंत...
नगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी १८ जागांसाठी तब्बल २२८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले - माजी सभापती भानुदास कोतकर इच्छुकांची मनधरणी करुन उमेदवारी अर्ज मागे काढण्यात सोसायटी, ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघात यशस्वी ठरले. परंतु, हमाल-मापाडी मतदारसंघात मात्र त्यांच्याच गटाचे दोन अर्ज राहिल्याने ती जागा बिनविरोध होता होता राहिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते व इच्छुक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज काढण्याबाबतचा घोळ शेवटपर्यंत सुरुच होता. तर उमेदवारी वरुन मोठा कल्लाही झाल्याचे सांगितले जात आहे. १६ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे ते तीघे कोणाला पाठिंबा देतात की उमेदवारी कायम ठेवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS