पारनेर / नगर सह्याद्री - पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक बन्सीभाऊ घंगाळे यांनी डोक्यात मी टोपी घालून आयुष्यभर निस्वार्थीपणे समाजकार्य...
पारनेर / नगर सह्याद्री -
पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक बन्सीभाऊ घंगाळे यांनी डोक्यात मी टोपी घालून आयुष्यभर निस्वार्थीपणे समाजकार्य केले त्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने महात्मा फुलेंची पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या जीवनावर एक गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला त्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन व जीवनगौरव पुरस्कार सन्मान सोहळा पारनेर मध्ये मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
पारनेर मध्ये आनंद लॉन मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बन्सीभाऊ घंगाळे यांचा अमृतमहोत्सव गौरव ग्रंथ प्रकाशन समितीच्या वतीने पारनेर येथे आयोजित केलेल्या जीवन गौरव पुरस्कार प्रदान व गौरव ग्रंथाचे प्रकाशन बहुजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मुंबई हायकोर्टाचे वकील माननीय संघराज रुपवते साहेबयांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बहुजनवादी विचारवंत डॉ रफिक जी सय्यद हे होते तर विचार मंचावर सत्कारमूर्ती बन्सीभाऊ घंगाळे त्यांच्या पत्नी सुगंधाबाई घंगाळे, मा.सौ.जीनाताई संघराज रुपवते, डॉ मोहिनीताई गायकवाड, रजनीताई बागुल ,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम पंचशील मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पी. टी. गायकवाड डॉ सीताताई भिंगारदिवे प्राचार्य विलास साठे ,शिवकांत शिंदे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद शिंदे,नगराध्यक्ष विजुभाऊ औटी उपनगराध्यक्ष सुरेखाताई भालेकर माजी नगराध्यक्ष वर्षाताई नगरे नगरसेविका हिमानी नगरे, सिद्धार्थ साळवे समितीचे अध्यक्ष प्रा दि.वा. बागुल सर वीरेंद्र पवारसर अँड पी आर कावरे , डॉ प्रा. दिलीप कसबे , अँड मंगल गायकवाड,मा. पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे , आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजू उबाळे बाळासाहेब सरोदे, जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव सर, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश देठे सरचिटणीस किशोर वाघमारे प्रा बाळासाहेब पाळंदे माऊली गाडेकर पाथर्डी चे विठ्ठल खोमणे आधी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुंबई हायकोर्टाचे ॲड संघराज रुपवते साहेब म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणारी माणसच आमचा आधारस्तंभ आहेत. अंधारात कोंडून ठेवलेले माणसांना प्रकाश माहीत नव्हता त्याची जाणीवही माणसांना नव्हती डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी सूर्य होऊन आले व आपल्याला सूर्यापेक्षाही प्रखर ज्ञानप्रकाश दाखवला.त्या काळात ज्यांना ज्यांना बाबासाहेब समजले त्यांनी त्यांचे त्यांच्या परीने बाबासाहेबांना आपल्यापर्यंत पोचवले . प्रत्येकाने आपापल्या परीने चळवळ जिवंत ठेवली . त्या काळात शिक्षण फारसे नसतानाही अशिक्षित लोकांनी ही चळवळ समजून घेतली तीच माणसे आमचा आधार आहे आंबेडकरी चळवळीचा पाया आहे ते पुढे असे म्हणाले की बन्सीभाऊनी डोक्यात निळी टोपी घालून जी आंबेडकरी चळवळ उभी केली ती खरच सर्वांना दिशा दाखवणारे आहे त्यांनी आयुष्यभर निस्वार्थीपणे समाजाची सेवा केली ती खरच आम्हाला अभिमानास्पद बाब आहे .त्यांनी समाजकार्य करताना आपल्या घराचा मुलाबाळांचा कधीही विचार केला नाही .उलट खेडया पाड्यातील मुले जास्तीत जास्त कसे शिक्षण घेतील यासाठी त्यांनी खेड्यातील मुलांना शहरातील वस्तीगृहामध्ये आणून त्यांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य केले. त्यासाठी त्यांनी सा. न.साळवे गुरुजी कु.यु.सोनवणे गुरुजी आदींच्या मदतीने सायकल वरून धान्य गोळा करून वस्तीगृहातील मुलांना शिक्षणासाठी जी काही मदत केली त्यामुळेच आज आम्ही सर्वजण समाजामध्ये मानाने वावरत आहोत. म्हणूनच हा जो काही त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. ही त्यांच्या कामाची छोटीशी पावती आहे.
बन्सीभाऊ घंगाळे यांनी आयुष्यभर निस्वार्थीपणे समाजकार्य केले त्यासाठी त्यांना पंचशील मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ पी. टी. गायकवाड यांनी खास पुण्यावरून महात्मा फुलेंची पगडी देऊन त्यांच्या कार्याचा आगळावेगळा गुणगौरव केला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्राध्यापक दि.वा. बागुलसर म्हणाले की डॉ बाबासाहेबांमुळेच आमचे नाव बदलले गावकुसा बाहेरची माणसे गावात आली उपेक्षितांच्या उरात नावा श्वास भरला गेला. आणि त्या श्वासातच स्वाभिमान निर्माण झाला. बन्सीभाऊ घंगाळे यांनी रात्रीची शेती व दिवसा समाजकार्य केले त्यातूनच आपल्यासारखे चळवळीचे वाहक तयार झाले. आंबेडकरी चळवळीतील माणूस आपल्या माणसाबद्दल कधीच चांगले बोलत नाही ते बुद्धांच्या विरुद्ध आहे. निस्वार्थीपणेकाम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान जिवंतपणे करा म्हणजे त्याला बळ मिळेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आर जी सय्यद म्हणाले की बन्सीभाऊ घंगाळे हा एक प्रकारचा काजवा आहे .आपण आपले काम करत राहू आंबेडकर चळवळ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण व्हायला पाहिजे .आपापसातील मतभेद विसरले पाहिजे यापुढे तुझे माझे करणे सोडून देऊ व बुद्धांच्या आणि तुकोबांच्या विचारावर म्हणजे समतेच्या मार्गाला आपण सोडता कामा नये .जिवंत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव होणे ही एक सुज्ञ व चांगुलपणाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आज वयाच्या ८९व्या वर्षी बन्सीभाऊ घंगाळे यांचा हा जो काही सन्मान होत आहे ही समाजाला एक दिशा देणारी गोष्ट आहे. त्यांचे भाचे पंचशील मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पी. टी. गायकवाड व राष्ट्रीय प्रवचनकार प्रा. दि.वा बागुलसर यांनी या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन केले हे खरच अतिशय मोलाचे व समाजाला एक दिशा देणारे कार्य आहे व भाच्यांनी मामांसाठी केलेले जे कार्य आहे ते अतिशय अनमोल आहे. माणूस मेल्यानंतर त्याच्या कार्याचा गौरव होण्यापेक्षा जिवंतपणे त्याच्या कार्याचा गौरव होणे त्याचे कौतुक केले तर त्याचे आयुष्य नक्कीच वाढते बन्सीभाऊ घंगाळे यांचे स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र व महात्मा फुलेंची पगडी देऊन त्यांचा व त्यांच्या पत्नीचा सामूहिक हार घालून व त्यांच्या जीवनावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन सत्कार प्रमुख अतिथी अँड संघराज रुपवते व त्यांच्या पत्नी सौ.जीनाताई संघराज रुपवते डॉ रफिक जी सय्यद ,सुधाकरराव रोहम , डॉ पी टी गायकवाड, प्रा. दि.वा बागुलसर,रमेश गायकवाडसर आदींनी केले. यावेळी तालुक्यातील तरुण सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ नगरे, गिरीश गायकवाड व सुनील बर्वे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पारनेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांमधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पारनेर शहरामधून फुलांनी सजवलेल्या गाडीमधून सनई चौघडा व तुताऱ्यांच्या आवाजामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विवेक गायकवाड यांनी बन्सीभाऊ घंगाळे यांच्या जीवनावर लिहिलेल्या निळी टोपीही डोक्याला, मामा तोऱ्यात चालला विशाल शिंदे यांनी गायलेल्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध झाले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राटच्या प्रतिनिधी सुनीताताई शिंदे, विवेक गायकवाड व सुनील शिंदे यांनी केले तर आभार प्रा. दि.वा बागुलसर यांनी मानले.
COMMENTS