भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या १९९० बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात अहमदनगर | नगर सह्याद्री शाळेत आणि मैदानावर ज्यांच्यासोबत ...
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या १९९० बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
अहमदनगर | नगर सह्याद्री
शाळेत आणि मैदानावर ज्यांच्यासोबत आपण खेळलो ,बागडलो.मैत्री केली,भांडणे केली,मस्ती केली, धिंगाणा घातला, कधी शिक्षा तर कधी कौतुक पण अनुभवले, चेष्टा मस्करी ने संपूर्ण शाळा दणाणून सोडणारे वर्गमित्र तब्बल ३३ वर्षांनी भेटले.अहमदनगर एज्युकेशन सोसायटी च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल च्या १९९० च्या दहावी बॅच चा स्नेहमेळावा नुकताच उत्सहात पार पडला.
अहमदनगर येथील हॉटेल स्वीट होम येथे संपन्न झाला. ज्या मित्र मैत्रिणीबरोबर सोबत खेळलो, बागडलो, मस्ती केली, भांडणे केली, एकत्र डबा खाल्ला त्यांना ३३ वर्षानंतर भेटत असल्यामुळे अनेकांना आपल्या बालमित्र मैत्रिणींना पाहण्याची त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. अनेक वर्षानंतर भेटत असल्यामुळे आपले मित्र मैत्रिणी आता आपल्याला ओळखतील का ? कसे दिसत असतील ? कोण काय काय करतंय ?असे अनेक प्रश्न मनात होते . या कार्यक्रमासाठी पुणे मुंबई औरंगाबाद आणि युरोपमधूनही वर्गमित्र मैत्रिणी आले होते. प्रत्येकाने एकमेकांची भेट घेऊन त्याच्या व्यवसायाबद्दल नोकरीबद्दल जाणून घेऊन चर्चा केली.
यावेळी वेगवेगळ्या कार्यां मधून विशेष कामगिरी करणार्या स्वर्गीय सुवालाल गुंदेचा पतसंस्थेचे अध्यक्ष किरण शिंगी, सत्यम इन्वेस्टमेंटचे संचालक आणि शेअर बाजार तज्ञ संजय मोरे, ठाणे पोलीस निरीक्षक स्मिता शिरसाठ, मनीषा चौकर, नायब तहसीलदार योगेश कुलकर्णी, डा. भूषण अनभुले, आशुतोष मुळे यांसह अनेक जण उपस्थित होते. यावेळी संजय मोरे आणि राहुल क्षीरसागर यांनी लहानपणीच्या आठवणी आणि किस्से सांगून उपस्थितांना मनमुराद हसवले. हे जग सोडून गेलेल्या वर्ग मित्र तसेच शिक्षकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणींनी संगीताच्या तालावर नृत्याचा आनंद घेतला. यावेळी विपुल शहा, अंजली कुलकर्णी, हर्षद देशपांडे, डॉटर समीर होळकर यांनी सर्व बालमित्र एकत्र येत असल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन योगेश अनासपुरे यांनी केले. प्रास्ताविक योगेश चंगेडिया यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवन शिंदे, भूषण भणगे, संदेश पिंपरकर, डॉ. अभिजीत कुलकर्णी, प्रवीण टकले, डा. ललित जोशी, केतन बल्लाळ, किरण खिस्ती, अंजली कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS