पुणे। नगर सहयाद्री - राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना असाच एक भयंकर अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर घडला आहे. देव...
पुणे। नगर सहयाद्री -
राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना असाच एक भयंकर अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर घडला आहे. देवदर्शन करून तुळजापूरहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या खाजगी बस खड्डयात उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील भवानीपेठ, लोहियानगर परिसरातील जवळपास ६० भाविक खाजगी बसमधून तुळजापूर व यरमाळा येथील देवीच्या दर्शनाला गेले होते.
देवदर्शन करून पुण्याकडे परत असताना दौंड तालुक्यातील मळद हद्दीतील घागरेवस्तीजवळ शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस मुख्य रस्ता व सेवा रस्त्याच्यामधील पावसाचे पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या मोरीमध्ये उलटली.
एका महिलेचा मृत्यू
या बस अपघातात बसमध्ये प्रवाशी अंगावर पडून खाली सापडल्याने एक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी तीस भाविक जखमी झाले असून त्यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले असून हे सर्व प्रवासी पुणे जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
COMMENTS