मुंबई | नगर सह्यद्री सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. ईदच्या एक दिवस आध...
मुंबई | नगर सह्यद्री
सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. ईदच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. बॉलिवूडसोबत साऊथचा तडका असलेल्या या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच गाजली.'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
एका नेटकऱ्यानं ट्विटरवर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील सलमानची एन्ट्री जबरदस्त आहे. त्याचा स्वॅग, मोठे केस, त्याची अॅक्शन या सर्व गोष्टींनी माझं मनं जिंकलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सिटीमार एन्ट्री' तर एका युझरनं लिहिलं, 'सलमान खानची एन्ट्री झाल्यानंतर थिएटर हे स्टेडियम झाले आहे, असं वाटू लागलं.'
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS