नवी दिल्ली वृत्तसंस्था- मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे. आईने आपल्या अल्पवयीन मुलीच लग्न ठरवले होते. लग्नाची धा...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे. आईने आपल्या अल्पवयीन मुलीच लग्न ठरवले होते. लग्नाची धामधुम सुरू असताना बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांची एन्ट्री झाल्याने चक्क आईचं नवरी बनून लग्नासाठी तयार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या आईला, मामालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवले होते. त्यासाठी ती मेहंदी गावात तिचे वडील आणि भावासह अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यासाठी जात होती. मात्र, पतीला मात्र हे लग्न मान्य नव्हते त्याने पोलिसांत पत्नीची तक्रार दिली.या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती.
पोलीस आल्याची खबर महिलेला मिळताच तिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी योजना आखली आणि नववधूचा पोशाख करून ती मंडपात जाऊन बसली. पण, महिलेच्या पतीने तिचा हा प्लॅनही उधळून लावला. या सगळ्या नाट्यानंतर महिलेला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं व अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबण्यात आला. या सगळ्या प्रकरणात महिलेला साथ देणारा तिचा भाऊ म्हणजेच मुलीच्या मामालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
COMMENTS