कोतवाली पोलिस ठाण्यात ३६ जणांवर गुन्हा दाखल | सहा जण जखमी अहमदनगर | नगर सह्याद्री लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन व जुन्या वादातून शेर...
कोतवाली पोलिस ठाण्यात ३६ जणांवर गुन्हा दाखल | सहा जण जखमी
अहमदनगर | नगर सह्याद्री
लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन व जुन्या वादातून शेरकर गल्ली, बारातोटी कारंजा येथे दोन गटात तुफान राडा झाला. मारहाण आणि अंधाधूंद दगडफेकीत दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले. दोन्ही गटाकडून फिर्याद देण्यात आली आहे. तब्बल ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पहिल्या फिर्यादीनुसार धिरज परदेशी, सागर आहेर, पृथ्वीराज उर्फ लल्ला परदेशी, ओंकार भागानगरे, परश्या (पूर्ण नाव माहित नाही) कोमाकुलचा, ओंकार घोलप व त्याचे ५ ते ७ अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद सुरेखा आदिनाथ लगड (वय ४०, रा, शेरकर गल्ली, माळीवाडा) यांनी दिली असून अबू सलीम ईमान सय्यद (वय २०, रा. पंचपीर चावडी), उजेर सय्यद, माजिद खान, अरबाज खान, उमेर सय्यद, आबू सय्यद, फैज बागवान, ताहिर खान (सर्वाचे वय अंदाजे १८ वर्ष, रा. पंचपीर चावडी, माळीवाडा) यांच्यासह १० ते १५ अनोळखी ईसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितळेरोडवर दगडफेक
सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास मिरावली दर्गा (चितळे रोड) जवळ चौपाटी कारंजा रोडकडून तोंडाला रुमाल बांधून १५ ते २० जणांचा घोळका शिवीगाळ व आरडाओरड करत आला. त्यातील काहींनी विनाकारण रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर दगडफेक केल्याने पळापळ झाली. दरम्यान गल्लीतील लोक जमा झाल्याने दगडफेक करणारे पळून गेले. याप्रकरणी शेख इजाज रेहमान (वय ५२, रा. मिरावली दर्गा शेजारी, चितळे रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन सोमवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी व त्यांच्या साथीदारांनी पहिला फिर्यादी व जखमी साक्षीदार ताहीर शेख, अबू सालेम यांच्यासह इतरांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार, वीटा, लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच अंधाधूंद दगडफेक केली. यात चौघे जखमी झाले आहेत. दुसर्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन इतर घरासमोर लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन इतर साथीदारांना बोलावून लाकडी काठ्या व बांबूचे दांडगे हातात घेऊन फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक करुन शिवीगाळ केली. संपून ठाकण्याची धमकी दिली. दगडफेकीत फिर्यादी यांच्या पायाला दगड मारून जखमी केले. शेजारी राहणारे उषा नानासाहेब साके यांनाही दगड मारुन जखमी केले. याप्रकरणी दोन्ही गटाकडून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS