पंढरपूर । नगर सहयाद्री - 'सबसे कातील गौतमी पाटील' अशी अल्पावधीत ओळख मिळवलेली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फ...
पंढरपूर । नगर सहयाद्री -
'सबसे कातील गौतमी पाटील' अशी अल्पावधीत ओळख मिळवलेली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. दररोज वेग-वेगळ्या कारणाने गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकते.आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या पंढरपूर येथील कार्यक्रमात राडा झाल्याची बातमी समोर अली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते. गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते.
महाराष्ट्रात गावोगावी हजारोंच्या रेकॉर्डब्रेक उपस्थितीत कार्यक्रम करणाऱ्या गौतमी पाटीलला आता इतर राज्यातूनही कार्यक्रमासाठी मागणी येऊ लागली आहे. काल पंढरपूरच्या वेळापूर येथे गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीच्या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावातील आणि तालुक्यातुन दुरुनदुरुन लोक या कार्यक्रमासाठी हजर झाले होते.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकातून हुल्लडबाजी सुरू झाली. पोलिसांनी प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.गाणे मध्येच थांबवून पोलिसांनी प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले. मात्र गौतमी स्टेजवर येताच तुफान शिट्टया सुरु झाल्या. दुसऱ्या गाण्यानंतर पोलिसांना सौम्य असा लाठीचार्ज करावा लागला. आणि अखेर कार्यक्रम थांबवावा लागला.
COMMENTS