पारनेर | नगर सह्याद्री राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समजणार्या मांडवे खुर्द गावच्या उपसरपंच पदी मनीषा विठ्ठल जाधव यांची बिनविरोध...
पारनेर | नगर सह्याद्री
राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समजणार्या मांडवे खुर्द गावच्या उपसरपंच पदी मनीषा विठ्ठल जाधव यांची बिनविरोध निवड झाली. शनिवारी सरपंच सोमनाथ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पाडण्यात आली. मनीषा विठ्ठल जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी अडसूळ भाऊसाहेब यांनी निवडणुक अधिकारी म्हणुन काम पाहिले.
त्याप्रसंगी मांडवे खुर्द ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य गौतम बागुल, माजी सरपंच जगदीश गागरे, पुजा गागरे, रेशमा गागरे, कमल गागरे, व त्याबरोबर विठ्ठल जाधव, यशवंत जाधव, पांडुरंग जाधव, नामदेव गागरे, रेवणनाथ गागरे, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब गागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच सोमनाथ आहेर म्हणाले की ग्रामपंचायत पदाधिकारी पदावर महिलांना संधी देणे आवश्यक असून महिलांना आपले प्रश्न मांडण्यास सोपे होईल व महिला वर्गाला न्याय मिळेल या हेतूने मनीषा जाधव यांना उपसरपंच पदी संधी देण्यात आलेली आहे.
तर नवनिर्वाचित उपसरपंच मनीषा जाधव म्हणाले की ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला मी त्याला जाऊ देणार नाही माझ्या पदाला आपल्या माध्यमातून निश्चित न्याय मिळवून देईल अशी आश्वासन उपसरपंच मनीषा जाधव यांनी दिली आहे.
या उपसरपंच निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राणीताई लंके, गुरुदत्त मस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे, ज्येष्ठ नेते भागुजी दादा झावरे, सरपंच प्रकाश गाजरे यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS