पत्रकारसह १०० व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. नवी दिल्ली / वृत्तसंस्था- म्यानमारमध्ये लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार...
पत्रकारसह १०० व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समजले आहे.
नवी दिल्ली / वृत्तसंस्था-
म्यानमारमध्ये लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी येथे मोठ्या संख्येने व्यक्ती जमल्या होत्या. मंगळवारी मध्य म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात १०० व्यक्ती ठार झाल्याची बातमी समोर अली आहे. बीबीसी बर्मीज, रेडिओ फ्री एशिया (आरएफए) आणि इरावडी न्यूज पोर्टल या माध्यम संस्थेमधील काही पत्रकारांचा यात मृत्यू झाला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,म्यानमारमध्ये मंगळवारी सकाळी ८ वाजता १०० ते १५० व्यक्ती या ठिकाणी सभेसाठी जमा झाल्या होत्या. त्यावेळी सैन्याकडून या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आला. या हल्ल्यात १०० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये विरोधी गटातील नेत्यांचाही समावेश आहे.
घटना घडली त्या गावात पिपल्स डिफेन्स फोर्स कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पिपल्स डिफेन्स फोर्स ही संघटना सरकार विरोधी काम करत आहे. साल २०२१ पासून ही संघटना म्यानमारमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे म्यानमार सैन्याने या घटनेसाठी सरकारविरोधी संघटना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS