अहमदनगर| नगर सहयाद्री- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी व राज्य सरकारने दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील आश्वासनावर कुठल्याही हालचाली न झाल्यामु...
अहमदनगर| नगर सहयाद्री-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी व राज्य सरकारने दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील आश्वासनावर कुठल्याही हालचाली न झाल्यामुळे अकोले येथून येत्या २६ एप्रिल रोजी महसूल व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवास्थानांवर किसान सभा लाॅन्ग मार्च काढणार आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, राज्य सरकारने नाशिक ते मुंबई लॉंगमार्चच्या वेळी देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळ बैठकीत कायद्याचा मसुदा मांडण्यासाठी अद्याप कुठल्याही हालचाली न झाल्याचा किसान सभेचे म्हणणे आहे. देवस्थान, गायरान, वनजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात.
दुधाच्या संदर्भात आयात धोरणाला विरोध तसेच मागच्या सरकारने दुधाच्या FRP साठी बनवलेली समिती पुनर्जीवित करावी. बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेम योजना सुरू करावी. या मागण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावापर्यंत किसान सभा लॉंग मार्च धडकणार आहे.
२६ एप्रिलला अकोले ते लोणी असा लॉंगमार्च असणार आहे. राज्यभरातून शेतकरी आणि किसान सभेचे कार्यकर्ते अकोले (जि. अहमदनगर) येथे जमणार आहे. लॉंगमार्चची लोणीकडे मार्गक्रमण होईल. रात्री संगमनेरजवळ पहिला मुक्काम होवून दुसऱ्या दिवशी पुन्हा मोर्चाला सुरवात होईल. तिसऱ्या दिवशी निमगाव जाळी येथून लोणीकडे प्रयाण आणि दुपारपर्यंत लॉंगमार्च महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी धडकणार आहे.
COMMENTS