मुंबई | नगर सहयाद्री समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. यशोदा, थेरी, माजिली, अ आ, अंजान, यु टर्न, पुष्...
मुंबई | नगर सहयाद्री
समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. यशोदा, थेरी, माजिली, अ आ, अंजान, यु टर्न, पुष्पा अशा सुपरहिट चित्रपटांतून समांथाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणार्या समांथाचा चाहता वर्गही मोठा आहे. समांथाच्या अशाच एका जबरा फॅनने तिचं मंदिर बांधलं आहे.
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बापटला अलापडू गावात चाहत्याकडून समांथाचं मंदिर बांधण्यात येत आहे. या मंदिराचं बांधकाम सध्या सुरू असून समांथाच्या वाढदिवशी म्हणजेच २८ एप्रिलला याचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. समांथाच्या या जबरा फॅनच नाव संदिप तेनाली असं आहे.
समांथा व तिच्या या चाहत्याची अद्याप भेट झालेली नाही. समांथाच्या प्रत्युष्या फांऊडेशनच्या कामामुळे प्रभावित होऊन तिचं मंदिर बांधत असल्याचं संदिप तेनाली यांनी सांगितलं.
COMMENTS