आमदार नीलेश लंके; शेतकरी पॅनलची आळकुटीत प्रचार सभा पारनेर | नगर सह्याद्री शेतकरी, सर्वसामान्याच्या हिताचे कोणतेही निर्णय घेण्यात अद्याप अपय...
आमदार नीलेश लंके; शेतकरी पॅनलची आळकुटीत प्रचार सभा
पारनेर | नगर सह्याद्री
शेतकरी, सर्वसामान्याच्या हिताचे कोणतेही निर्णय घेण्यात अद्याप अपयशी ठरलेल्यांची बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्यासाठी पारनेर तालुयात लुडबुड चालू आहे, अशी टीका आ. नीलेश लंके यांनी खा. सुजय विखे यांचे नाव न घेता केली.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी बुधवारी अळकुटी गणातील ग्रामपंचायत, सोसायटी मतदारांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे, जि. प.चे माजी सभापती मधुकर उचाळे, कुंदन काका साखला, बाबाजी भंडारी, माजी सभापती सुदाम पवार, सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, माजी उपसभापती दीपक पवार, शिवाजी बेलकर, प्रा. संजय लाकुडझोडे, किसनराव रासकर, कारभारी पोटघन, मेजर राहुल झावरे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी, अशोक सावंत, शंकरराव नगरे, विजय पवार, आबासाहेब खोडदे, संदीप सालके, किसन सुपेकर, डॉ. पद्मजा पठारे, मेघा रोकडे, बाबासाहेब नर्हे, भाऊसाहेब शिर्के, चंदन भळगट आदी उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळुंन माजी आमदार विजय औटी व आम्ही सर्वांनी त्यांना मताधिय दिले. त्यांना लोकसभेला निवडून आणण्यामध्ये शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे भाजपचे खासदार मोठेपणाने सांगतात. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी होताच ते तालुयात राजकारण करू लागले आहे. गेल्या पन्नास वर्षे तुम्ही जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचे सांगून तुम्ही फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी गटातटाची भांडणे लावल्या असल्याचा आमदार लंके यांनी करत त्यांना भांडणाच्या माध्यमातून नव्हे, तर मतदानातून उत्तर द्यावे असे आवाहन केले.
मतांची दुकानदारी, करणारे तालुयाच्या राजकारणात; झावरे
पारनेर तालुका व संघर्ष समीकरणच आहे. तालुयाच्या राजकारणात मतांची दुकानदारी व विक्री करणारे उदयास आले आहेत. त्यांच्या विरोधात लढाई उभी करणे गरजेचे आहे, असे मत माजी सभापती राहुल झावरे यांनी यावेळी व्यक्त केले. तालुयात दहशत असल्याचे सांगून जे मते मागत आहेत, त्यांनी आमदार लंके यांचे कोविड काळातील काम पहावे. जिल्ह्यामध्ये एक अभ्यास समिती म्हणून माजी आमदार विजय औटी यांच्याकडे पाहिले जाते. या वयात त्यांना कोणत्या राजकीय महत्त्वकांक्षा असतील असे वाटत नाही. पारनेर तालुयाचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला, असेही झावरे म्हणाले.
औटी म्हणाले, पारनेर तालुयाच्या विकासाला आणि संस्कृतीला नख लावण्याचे पाप करणार्या हितशत्रूंच्या विरोधात मतदारांनी वज्रमूठ आवळली आहे. मतदारांची उपस्थिती आणि उत्साह १०० % विजयाची खात्री देणार होता. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या ऐतिहासिक विजयाची ही सभा नांदी ठरेल.
COMMENTS