मुंबई। नगर सहयाद्री- मित्रांसोबत पार्टीला जात आहे, असं म्हणत तरुणी रात्री घराबाहेर पडली. रात्रभरात ती घरी परतली नाही.आई -वडिलांना सकाळी मिला...
मुंबई। नगर सहयाद्री-
मित्रांसोबत पार्टीला जात आहे, असं म्हणत तरुणी रात्री घराबाहेर पडली. रात्रभरात ती घरी परतली नाही.आई -वडिलांना सकाळी मिलालेली माहिती धक्कादायक होती. मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. प्रिया कनोजिया असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, ८ एप्रिल शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडली होती. रविवारी पहाटे पार्टीवरून परतत असताना परत येत असताना प्रिया स्कुटर चालवत होती. तिच्या पाठीमागे तिचा ऑफिसमधील एक मैत्रीण बसली होता. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर दहिसर परिसरात असताना त्यांच्या स्कुटीचा अपघात झाला.यामध्ये प्रियाचा जागीच मृत्यू झाला तर तिची मैत्रीण जखमी झाली आहे.
मित्रांसोबत पार्टीला जात आहे, असं तिने आईला सांगितलं. रात्री उशीर होऊन सुद्धा प्रिया घरी न आल्याने तिच्या आईने प्रियाच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर फोन केला. तेव्हा प्रियाचा पार्टीवरून परतत असताना वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील दहिसर परिसरात अपघात झाला, असं तिच्या मैत्रिणीने सांगितले. ही घटना ऐकून आईल धक्काच बसला. दरम्यान, प्रियाच्या आई-वडिलांनी दहिसर परिसरात धाव घेतली.
प्रियालाअपघातानंतर कांदिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रियाचे आई-वडील रुग्णालयात पोहचले. तेव्हा प्रियाचा अपघाती मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत प्रियाच्या मैत्रिणीने अद्याप माहिती दिलेली नाही.
COMMENTS