मुंबई। नगर सहयाद्री- अंधेरी पूर्व भागातील अंधेरी कुर्लामधून एक धक्कादायक घटना उगडकिस अली आहे. एका प्रतिष्टीत हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण झाले...
मुंबई। नगर सहयाद्री-
अंधेरी पूर्व भागातील अंधेरी कुर्लामधून एक धक्कादायक घटना उगडकिस अली आहे. एका प्रतिष्टीत हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण झाले. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तेरा तासातच घटनेचा उलगडा करत ७ आरोपींच्या फिल्मी स्टाईलने मुसक्या आवळल्या आहे. अनुप शेट्टी (वय ४५) असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,अंधेरी कुर्ला रोडवर अनुप शेट्टी यांचे हॉटेल वीरा आहे. यात व्यवसायिक भागीदार म्हणून विजय ओखीरकर (४२ वर्षे) यास सोबत घेते. भागीदारीत वाद निर्माण झाल्यामुळे विजय वखिरकर याने आपले अडीच लाख रुपये शेट्टी यांच्याकडे पुन्हा मागितले. मात्र अनुप शेट्टी हे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या रागातून फिल्मी स्टाईलने सोमवारी दुपारी तीन वाजता हॉटेल वीरा रेसिडेन्सीजवळ अनुप शेट्टी यांच्यावर गोळीबार करून धमकावत गाडीत जबरदस्तीने टाकून सात जणांनी त्यांचे अपहरण केले.
यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.अपहरणकर्ते शहापूर परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी शहापूर भागातील रस्त्यावर वाहने आडवी लावून अपहरण कर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांच्या गाड्या आपल्या गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला.अखेर पोलिसांनी आपल्या जवळील बंदुका काढून अपहरणकर्त्यांवर रोखल्यानंतर आरोपी पोलिसांना शरण आले. व अपहृत हॉटेल व्यवसायिकाची सुखरूप सुटका केली.
COMMENTS