मुंबई|नगर सहयाद्री अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सिनेमा आणि तिच्या फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सध्या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय...
मुंबई|नगर सहयाद्री
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सिनेमा आणि तिच्या फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सध्या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. तसेच ती अनेक इव्हेंट्सना देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असते. अशा इव्हेंट्समधील तिच्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. पण, बर्याचदा तिला तिच्या लूकमुळे चाहते ट्रोलही करतात.
जान्हवी कपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे तिला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. जान्हवीने एका अवॉर्ड शोला हजेरी लावली होती. यावेळी ती हिरव्या रंगाचा ड्रेस घालून पोहोचली होती. तिला या हिरव्या गाऊनवरून चाहत्यांनी चांगलच सुनावलं आहे. तू काहीही करशील तरी नोरा फतेही नाही होऊ शकत, असं एका यूजरने कॉमेंट्स मध्ये लिहिले आहे.
हिची तुलना श्रीदेवींचा अभिनय किंवा स्टाइलशी आजिबात होऊ शकत नाही, अशी कमेंट दुसर्या युजरने केली आहे. तर हे लोक आरशात बघून घराबाहेर पडत नाहीत का? यांचे डिझायनर जे देत असतात, तेच घालून घराबाहेर पडतात. यांना स्वतःची काडीची अक्कल नाही का? असं तिसर्या युजरने सुनावलं आहे.
COMMENTS